अर्ज करा

आमच्याबद्दल

ग्रामपंचायत अंबुलगा - तालुका चाकूर, जिल्हा लातूर

जिल्हाविषयी संक्षिप्त माहिती

लातूर जिल्हा

लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात वसलेला आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग शेतीप्रधान असून येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सोयाबीनऊस ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. तसेच ज्वारी, गहू, तूर, मूग, उडीद, हरभरा व भूईमूग यांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

लातूर शहराजवळ अनेक साखर कारखाने व ऑईल मिल्स असल्यामुळे हा जिल्हा व्यापाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर वसलेला हा जिल्हा रेल्वे व रस्ते वाहतुकीने जोडलेला आहे.

शिक्षण क्षेत्रात “लातूर पॅटर्न” मुळे हा जिल्हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.

गाव परिचय

ग्रामपंचायत अंबुलगा

ग्रामपंचायत अंबुलगा हे गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. लातूर–नागपूर राज्य मार्गावरील आष्टा मोडपासून पूर्व दिशेस सुमारे ७ कि.मी. अंतरावर हे गाव स्थित आहे.

गावामध्ये श्री हनुमान मंदिर असून गाव स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून कार्यरत आहे. परिसरातील मोठे व गजबजलेले गाव म्हणून अंबुलगा ओळखले जाते. तसेच येथे “आपले सरकार सेवा केंद्र” कार्यरत असून नागरिकांना विविध आवश्यक दाखले उपलब्ध करून दिले जातात.

ग्रामपंचायत कार्यालय अंबुलगा

ग्रामपंचायत कार्यालय, अंबुलगा (ता. चाकूर, जि. लातूर)

गावातील समाज
मराठा, मांग, महार इत्यादी
मुख्य व्यवसाय
शेती
मुख्य पिके
सोयाबीन, मूग, उडीद, ऊस, भाजीपाला
समित्या
JFM (वन व्यवस्थापन), BMC (जैवविविधता)

शेती व उत्पादन

गावामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून सोयाबीन, मूग, उडीद, ऊस तसेच विविध भाजीपाल्याची लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ऊस व भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

पर्यावरण व जैवविविधता

अंबुलगा ग्रामपंचायतीमध्ये वन व्यवस्थापन समिती (JFM)जैवविविधता व्यवस्थापन समिती (BMC) स्थापन करण्यात आलेल्या आहेत. गावातील लोक आवळा, आंबा, जांभूळ, पेरू इत्यादी फळझाडांची लागवड करून त्यांचा उपयोग औषधी व बागायती कामांसाठी करतात.

सण व उत्सव

वेळ अमावस्या, दिवाळी तसेच इतर सर्व राष्ट्रीय व धार्मिक सण गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव, शारदा उत्सव, दुर्गा उत्सव, होळी, रंगपंचमी, नागपंचमी, मकरसंक्रांत हे गावातील प्रमुख सण आहेत.

बैलपोळा – या सणामध्ये शेतकरी आपल्या बैलांची पूजा करून त्यांना सजवतात व कृतज्ञता व्यक्त करतात.

हंगाम व पाऊस

साधारणतः गावातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे खरीप हंगामात सोयाबीन पेरणी व ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. वेळ अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतामध्ये पूजा करतात व चांगल्या उत्पादनासाठी देवाकडे प्रार्थना करतात. त्या निमित्ताने नातेवाईक व मित्रपरिवार यांना जेवणासाठी व आंबील पिण्यासाठी आमंत्रित केले जाते.

जिल्ह्यात नैऋत्य मान्सूनमुळे पावसाळा सुरू होतो. साधारणतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असतो. काही वर्षांमध्ये पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेती उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.

कार्यकारिणी

ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते

आमचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य (कार्यकारिणी दि. ०४-०१-२०२३)

सौ. तेलंगे विद्याबाई बाबुराव

सरपंच

सौ. तेलंगे विद्याबाई बाबुराव

ग्रामपंचायत अध्यक्ष.

9823818877
श्री. जाधव गोविंदराव काशिनाथ

उपसरपंच

श्री. जाधव गोविंदराव काशिनाथ

ग्रामपंचायत उपाध्यक्ष.

9922729925

सदस्य

श्री. जाधव अरविंद श्रीपतराव

निवडून आलेले सदस्य.

9823556428
सौ. गरड वंदना जगन्नाथ

सदस्या

सौ. गरड वंदना जगन्नाथ

निवडून आलेली सदस्या.

9923077807

सदस्या

सौ. जाधव सरिता पांडुरंग

निवडून आलेली सदस्या.

8552019612
सौ. शिंदे मिना अंकुश

सदस्या

सौ. शिंदे मिना अंकुश

निवडून आलेली सदस्या.

9823286762
सौ. इंगोले वर्षाराणी नवनाथ

सदस्या

सौ. इंगोले वर्षाराणी नवनाथ

निवडून आलेली सदस्या.

7972350259
श्री. कोंपले संतोष विनायक

सदस्य

श्री. कोंपले संतोष विनायक

निवडून आलेले सदस्य.

7498646806
श्री. कांबळे सुखदेव रामराव

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. कांबळे सुखदेव रामराव

ग्रामपंचायत प्रशासकीय कारभार.

9960927527

ग्रा.प. सेवक

श्री. स्वामी रामेश्वर गंगाधर

ग्रामपंचायत सेवक.

9764170436

पा.पु. सेवक

श्री. सूर्यकांत ज्ञानोबा गरड

पाणी पुरवठा सेवक.

9359986037
श्री. लहुबंदे बाळासाहेब मनोहर

सरपंच

श्री. लहुबंदे बाळासाहेब मनोहर

संगणक परिचालक.

9284201667
श्री. लहुबंदे बाळासाहेब मनोहर

संगणक परिचालक

श्री. लहुबंदे बाळासाहेब मनोहर

संगणक परिचालक.

9284201667